Dombivli – मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे. राम पोटे असे याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे.
हेमंत धिरजलाल वाडेल यांनी त्यांची मोटारसायकल ओम सुवृत्ती को.हौ.सो, राजाजी पथ, डोंबिवली पूर्व येथे सोसायटीच्या मोकळया जागेमध्ये पार्क करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने सदर मोटारसायकल चोरून नेली असल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे डोंबिवली पूर्वेतील केळकर रोडवरून रामला अटक केली आणि त्याच्याकडून चोरीस केलेली २५,०००/- रूपये किंमतीची मोटारसायकल हस्तगत केली.