डोंबिवली – डोंबिवली पूर्व बाजीप्रभू चौक वृंदावन हॉटेलच्या वरती राजरोसपणे जुगार अड्डा चालू असून, हा अड्डा रतन नावाचा व्यक्ती चालवत आहे. याबाबत गेल्या ४ ते ५ दिवसांपासून राम नगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिसांना याची माहिती देऊनही कारवाई होत नाही याचा अर्थ हा जुगार वरिष्ठांच्या आशीर्वादाने चालू आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
(तेथे कोणत्याही प्रकारे कारवाई होत नाही, त्याठिकाणी गुंड प्रवृत्तीची लोक नशा करून जुगार खेळण्यासाठी येत असतात. त्यामुळे त्याठिकणी वादावादी, भांडण, मारहाण असे प्रकार होण्याची शक्यता आहे. पोलिसांना माहिती दिली तरी ते तिथे जात नाहीत, तसेच जर पोलीस तेथे गेले तर तेथे असा कोणत्याही प्रकारचा जुगार चालत नसल्याचे पोलीस सांगतात. परंतु तेथे दररोज दिवसरात्र जुगार चालू असतो.)
याची दखल ठाणे पोलीस आयुक्तांनी घेऊन राम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालू असणारा हा जुगार अड्डा बंद करावा. अशा अवैध धंदे चालवणाऱ्या चालक-मालकांवरती कारवाई करावी. तसेच हा जुगार अड्डा कोणत्या वरिष्ठ पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहे याची शाहनिशा करून त्यांच्यावरही कारवाई करावी.