मुंबई – दिवसा घरफोडी करणा-या सराईतास गुन्हे शाखा, कक्ष ३ विरार पोलिसांनी अटक करुन एकूण १४ गुन्हे उडघकीस आणेल. तसेच एकूण २,८९,५५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अक्रम फारुक अन्सारी असे अटक कऱण्यात आलेल्याचे नाव आहे.
श्री. साई गणेश अर्पाटमेंट २, विकास नगरी फुलपाडा, विरार पुर्व, ता. वसई, जि. पालघर येथे फिर्यादी रुक्मिणी गोवेकर व त्यांच्या बिल्डींगमध्ये राहणारे प्रविण पांगम यांच्या घरातील २८,५००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्याने चोरी करून नेले असल्याबाबत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे अक्रम फारुक अन्सारी यास अटक केली. त्याच्याकडून गुन्हयात वापरण्यात आलेले वाहन, सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल असा एकूण २,८९,५५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून विरार पोलीस ठाण्यातील एकूण १४ गुन्हे उघडकीस आणेल. .