लोटे MIDC तील कंपनीमध्ये वायू गळती…

Published:

रत्नागिरी – खेड तालुक्यातील रासायनिक MIDC असलेल्या लोटे एमआयडीसीतील एका एक्सेल कंपनीमधून मंगळवारी रात्री अचानक वायू गळती झाली असल्याची माहिती समोर आली असून, या वायू गळतीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात असणाऱ्या तलारेवाडी येथील ४० ते ५० ग्रामस्थांना वायू बाधा झाली. त्यात लहान मुलं आणि महिलांचा देखील समावेश आहे. वायू बाधा झालेल्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, वायू गळती कशामुळे झाली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page