विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी…

Published:

मुंबई – विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक पार पडली. यात एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी झाले आहेत.

भाजपचे उमेदवार योगेश टीळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांचा विधानपरिषद निवडणुकीत विजय झाला आहे. या पाचही जणांना २६ मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव गर्जे यांना २४ आणि राजेश विटेकर यांना २३ मतं मिळाली असून, शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने यांना २५ मतं आणि भावना गवळी यांना २४ मतं मिळाली आहेत.

महाविकास आघाडीचे काँग्रेस कडून डॉ. प्रज्ञा राजीव सातव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे मिलिंद नार्वेकर, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते.

यात महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना २५ मते मिळाली तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे मिलिंद नार्वेकर यांना २४ मते मिळाली असून, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पाटील यांना १२ मते मिळाल्यामुळे त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी कडून निवडणुकीत रिंगणात असलेले ३ पैकी २ उमेदवारांचा विजय झाला आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page