ठाण्यात महिलेचा विनयभंग!…

Published:

ठाणे – ठाण्यात एका महिलेचा तिच्या घरात घुसून विनयभंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातील हाजुरी दर्गा रोड परिसरात रहाणार्‍या एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला बाजारात भाजी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिथे एक इसम ५००/- रुपये सुट्टे आहेत का? असे दुकानदाराला विचारत होता. दुकानदाराने नाही म्हंटल्यावर त्याने सदर महिलेला ५०० रु. सुट्टे आहेत का असे विचारले. त्यावेळी महिलेने माझ्याकडे  सुट्टे नाहीत असे संगितले. त्यानंतर हि महिला घरी जात असताना सदर इसमाने तिचा पाठलाग केला आणि तिच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला.

सदर प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page