घाटकोपर होर्डिंग प्रकरणी मोठी कारवाई; अतिरिक्त डीजीपी कैसर खालिद निलंबित…

Published:

मुंबई – घाटकोपर होर्डिंग प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद यांना निलंबित करण्यात आले आहे. पत्नीच्या बँक खात्यात लाच स्वीकरल्याच्या आरोपाखाली खालिद यांच्यावर हि कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कैसर खालिद यांच्या पत्नीच्या बँक खात्यात घाटकोपर होर्डिंगच्या परवानगीसाठी संबंधित कंपनीने लाखो रुपये जमा केल्याचे तपासात उघड झाले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर खालिद यांचे निलंबन करण्यात आले आहे. घाटकोपर होर्डिंगला पोलीस महासंचालक कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर परवानगी दिल्याचा आरोप कैसर खालिद यांच्यावर आहे.

दरम्यान, राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात आयपीएस कैसर खालिद यांना पुढील आदेश येईपर्यंत तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्याचे म्हटले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page