डोंबिवली – घरफोडी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलास कल्याण गुन्हे शाखेने अटक करून त्याच्याकडून एकूण ४,२५,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत केला.
पोना सचिन वानखेडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मानपाडा माणगाव नाका, कल्याण शिळ रोड, डोंबिवली (पूर्व) याठिकाणी सापळा रचून या अल्पवयीन मुलास अटक केली. तसेच त्याच्याकडून ३,९५,०००/- किंमतीचे १२ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि १ मोटारसायकल असा एकूण ४,२५,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत केला. आणि शिळ डायघर, मानपाडा पोलीस ठाण्यातील एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले.
सदरची यशस्वी कामगिरी कल्याण गुन्हे शाखेचे वपोनिरी नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संदीप चव्हाण, पोलीस हवालदार माने, पोलीस हवालदार कामत, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस नाईक सचिन वानखेडे, पोलीस शिपाई चन्ने, पोलीस शिपाई नवसारे, महिला पोलीस हवालदार जोसना कुंभारे यांनी केली आहे.