घरफोडी व वाहन चोरी करणारे अटकेत…

Published:

ठाणे – राबोडी व कळवा पोलीस ठाणे हद्दीतील वाईन शॉपसह ५ दुकानांचे शटर उचकटून घरफोडी चोरी तसेच मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांना राबोडी पोलिसांनी अटक करून राबोडी आणि कळवा पोलीस ठाण्यातील एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

राबोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले वाईन आणि बिअर शॉप फोडून घरफोडी चोरी केली असल्याबाबत राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर दोघांना ठाण्यातील गोकुळनगर परिसारातून मोटारसायकलसह अटक करून राबोडी आणि कळवा पोलीस ठाण्यातील एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले.

तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम. मोबाईल, टॅब आणि मोटरसायकल असा एकूण ८२४१७/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page