मुंबईत चाळीची भिंत कोसळून दुर्घटना…

Published:

मुंबई – वडाळा अँटॉप हिल परिसरात चाळीची भिंत कोसळून दुर्घटना घडली असून, या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा येथील अँटॉप हिल विजयनगर येथील पंजा गल्लीत ही घटना समोर आली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील भिंत कोसळून ही दुर्घटना घडली आहे. भिंत कोसळून भिंतीचा भाग कोसळल्यानंतर या दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या.

त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच दोन्ही महिलांचा मृत्यू झाला.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page