कल्याण – कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीच जीवितहानी झाली नाही.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशव्दारावरील डाव्या बाजुला हा बुरूज आहे. नागरिक दुर्गाडी किल्ल्यावर येऊ लागले, त्यावेळी त्यांना बुरूजाचा दर्शनी भाग कोसळला असल्याचे समजले.
दरम्यान, दुर्गाडी किल्ला हा कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत येत असला तरी त्यावर नियंत्रण पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे.