ठाणे – १ कोटी ३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्यास माउंट आबू पर्वत, राजस्थान येथून नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. विशालसिंग राजपूत असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याच्या दागिन्यांपैकी सुमारे १,१०,००,००० /- रुपये किंमतीचे १७४५.०८० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, विरासत ज्वेलर्समध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या विशालसिंग कानसिंग राजपूत याने सिध्दार्थ ज्वेलर्स येथून विरासत ज्वेलर्स येथे आणण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने विरासत ज्वेलर्स येथे न देता, विरासत ज्वेलर्स येथून इतर सेल्समनची नजर चुकवून काही सोन्याचे दागिने चोरी (एकूण १,३०,१४,७२०/- रू. किंमतीचे १८०७.६०० ग्रॅम वजनाचे) केले असल्याबाबत यशवंत पुनमिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे विशालसिंग राजपूतला माउंट आबू पर्वत, राजस्थान येथून अटक केली आणि त्याच्याकडून सोन्याच्या दागिन्यांपैकी सुमारे १,१०,००,००० /- रुपये किंमतीचे १७४५.०८० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले.
सदर यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त, परि. १ सुभाष बुरसे, सहा. पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे नौपाडा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोनि (गुन्हे) शरद कुंभार, पोनि सुनिल तांबे (प्रशासन) यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी मंगेश भांगे, सहायक पोलीस निरीक्षक, पोउनि दत्तात्रय लोंढे, पोउनि संगम, पाटील पोउनि मकानदार, पोहवा गायकवाड, पोहवा पाटील, पोहवा देसाई, पोहवा रांजणे, पोहवा गोलवड, पोहवा तडवी, पोहवा विरकर, पोना माळी, पोशि कांगणे, पोशि तिर्थकर यांनी केली आहे.