कल्याण – गावठी कट्ट्यासह एकाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. केतन बोराडे असे याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून २५,६००/- रुपये किंमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा, १ मॅग्जीन, ३ जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत केला.
लोकसभा निवडणुकीच्या मोक्यावर बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन साळवी यांना गुप्त बातमी मिळाली की राम मारुती चौक, कल्याण येथे संशयितरित्या गावठी कट्ट्यासारखे अग्नीशस्त्र घेऊन काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने एक इसम फिरत आहे. त्याअनुषंगाने पोलीस हवालदार सचिन साळवी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून केतन बोराडे यास अटक केली आणि त्याच्याकडून २५,६००/- रुपये किंमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा, १ मॅग्जीन, ३ जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत केला.