घरफोडी चोरी करणारे अटकेत…

Published:

डोंबिवली – घरफोडी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून अटक करून, ४ गुन्हे उघडकीस आणेल आहेत.

चिंटू चौधरी निशाद आणि बबलू उर्फ राजेश बनारसी कहार असे या दोघांचे नाव आहे. मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यसाठी पोलीस तपास करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उत्तर प्रदेश येथे जाऊन दोघांना अटक करून ४ गुन्हे उघडकीस आणले तसेच त्यांच्याकडून ३२५.४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ०७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, असा एकूण २२,७७,८००/- रू. किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page