नाशिक – आयसीआयसीआय होम फायनान्सच्या कार्यालयावर मोठा दरोडा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बँकेच्या सेफ्टी लॉकर मधून २२२ खातेदारांचे तब्बल ४ कोटी ९२ लाखांचे दागिने चोरट्यांनी चोरले आहेत. जूना गंगापूर नाका परिसरात हि घटना घडली असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिसऱ्या मजल्यावर असलेल्या या कार्यालयात चोरांनी पीपीई कीट घालून लॉकर्स फोडून ही चोरी केली. या चोरीचे सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आले आहेत.