भिवंडीत ८७ हजारांचा गुटखा जप्त…

Published:

ठाणे – भिवंडीतील दापोडा परिसरातून नारपोली पोलिसांनी ८७ हजारांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून एकास अटक केली आहे. अजय गुप्ता असे याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रेरणा काम्प्लेक्स, डी-३ बिल्डींग, दुसरा मजला, दापोडा, भिवंडी येथे छापा टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखूजन्य पदार्थ एकूण ८७,१२०/- रूपये किमंतीचा विमल पानमसाला जप्त केला तसेच अजय गुप्ता हा सदर तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा) बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यास अटक केली.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page