प्रसिद्ध गायक नंदेश उमप निवडणुकीच्या रिंगणात…

Published:

मुंबई – प्रसिद्ध शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र आणि प्रसिद्ध गायक नंदेश उमप लोकसभा निवडणुकीला उभे राहिले आहेत. नंदेश उमप यांनी बहुजन समाजवादी पक्षाच्या वतीने ईशान्य मुंबईमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उमप म्हणाले की, समाजकार्यासाठी आपण देखील काहीतरी केले पाहिजे. आता आपण वेगळी इनिंग खेळली पाहिजे, याच हेतूने मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे.

दरम्यान, ईशान्य मुंबईतून महायुतीने मिहिर कोटेचा यांना, तर महाविकास आघाडीने संजय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उमप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे आता या मतदारसंघात तिंरगी लढत असेल.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page