मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल…

Published:

ठाणे – मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका सराफाकडून ५ कोटींची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाथ जाधव यांचे मित्र वैभव ठक्कर यांना हिशोबासाठी सराफाने बोलावले असताना, अविनाश जाधव यांनी तिथे सराफाच्या मुलाला मारहाण केली. तसेच जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना ५ कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर व अविनाश जाधव यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page