नांदेडमध्ये तरुणाने कुऱ्हाडीने फोडली EVM मशीन…

Published:

नांदेड – नांदेड लोकसभा मतदारसंघातील एका केंद्रात तरुणाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली आहे. बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर मतदान शांततेत सुरू असतानाच एका तरुणाने ईव्हीएम मशीन फोडली.

या तरुणाने मतदान केंद्रात घुसून चक्क छोट्या कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन फोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. भय्यासाहेब एडके असे तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page