ठाणे – ठाण्यातील राबोडी परिसरातून एका सराईत गुन्हेगाराकडून मोठा शस्त्रसाठा खंडणी विरोधी पथक आणि विशेष कृती दल, गुन्हे शाखा, ठाणे शहर पोलिसांनी जप्त केला आहे. शंभु महतो असे याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ४ पिस्टल, २ गावठी कटटे, १ मॅगझीन व १८ जिवंत काडतुसे जप्त केली तसेच त्याला अटक करण्यात आली आहे.
शंभु महतो यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर अवैध अग्नीशस्त्र, काडतुसे, गावठी कट्टे असून, हा सर्व साठा घेऊन तो विक्रीकरीता साकेत रोड, राबोडी, ठाणे येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून शंभूला अटक केली. आणि त्याच्याकडून ४ पिस्टल, २ गावठी कटटे, १ मॅगझीन व १८ जिवंत काडतुसे असा एकूण ३,४०,०००/- रूपये किंमतीचा शस्त्रसाठा जप्त केला.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे, शोध २. गुन्हे शाखा, ठाणे शहर, सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील मपोनि/वनिता पाटील, सपोनि/श्रीकृष्ण गोरे, सपोनि/भुषण कापडणीस, सपोनि/सुनिल तारमळे, पोउनि/विजयकुमार राठोड, सपोउनि/सुभाष तावडे, सपोउनि/कल्याण ढोकणे, सपोउनि/संजय बाबर, पोहवा/सचिन शिंपी, पोहवा/योगीराज कानडे, पोहवा/संजय राठोड, पोहवा/गणेश गुरसाळी, मपोहवा/शितल पावसकर, मपोशि/मयुरी भोसले, पोशि/तानाजी पाटील, पोशि/अरविंद शेजवळ, पोशि/विनोद ढाकणे चापोना/भगवान हिवरे यांनी केली आहे.