डोंबिवली – कल्याण गुन्हे शाखेने १६० लिटर गावठी हातभट्टीची दारू पकडली आहे. तसेच एकास अटक केली. प्रथम जाधव असे याचे नाव असून, मोटार सायकलवरून वाहतूक करत असताना हि दारू पकडण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टिळकनगर पोलीस ठाण्याचे हद्दीतील मोहन सृष्टी बिल्डींग जवळील रोडवर, कचोरे गाव, डोंबिवली (पुर्व) याठिकाणी सापळा रचून प्रथम जाधवला अटक केली. तो मोटार सायकलवरून हि दारू वाहतूक करत असताना मिळून आला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत शैलेश भोईर याच्या मालकिची व त्याच्या सांगण्यावरून तो हे करत होता. दरम्यान, पोलिसांनी त्याच्याकडून गवठी दारू आणि मोटार सायकल असा एकूण ३६,०००/- रु. मुद्देमाल जप्त केला असून, आरोपी आणि मुद्देमाल टिळक नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. तसेच दारूची व्हिल्हेवाट लावण्यात आली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी गुन्हे शाखा घटक ३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.प्रशांत वानखेडे, अनुप कामत यांनी केली आहे.