एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणारा जेरबंद…

Published:

कल्याण – एटीएम कार्डची अदलाबदली करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यास महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे. दिपक झा असे याचे नाव आहे.

महात्मा फुले चौक पो. स्टे. कल्याण हद्दीत फिर्यादी महेश्वरी मुदलीयार या त्यांच्या आईसोबत कल्याण पश्चिम येथील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्याकरीता गेल्या असता दोन अनोळखी इसमांनी मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदली करून त्यांच्या कोटक महिंद्रा बँकेच्या सॅलेरी अकाउंट मधून एकूण  २२,०००/- रू. लबाडीने काढून घेतले असल्याबाबत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून दिपक झा याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने त्याच्या साथीदारासह एटीएम सेंटरमधून एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदल करून बोलण्यात गुतवून पिन नंबर पाहून एटीएम मधून पैसे काढले असल्याचे सांगितले तसेच त्याने कल्याण, वसई, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, ठाणे, मुंबा, नवी मुंबई, नांदेड व नाशिक जिल्हयात विविध पोलीस ठाणे हद्दीत असे एकूण १६ फसवणूकीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली.

सदर प्रकरणी पोलिसांनी दिपककडून वेगवेगळया बँकांची ९२ एटीएम कार्ड आणि २६,०००/- रू. रोख रक्कम, १ मोटार सायकल हस्तगत केली आहे. दिपक झा याच्यावर याआधी ८ फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच याने त्याच्या साथीदारांसह ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नोंदेड, पुणे या जिल्हयात फसवणूकीचे गुन्हे केले असल्याची माहिती समोर आली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, सचिन गुंजाळ, सहायक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग, कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि शैलेश साळवी, पोउपनिरी तानाजी वाघ, पोहवा के.जी.जाधव, पोहवा मनोहर चित्ते, पोहवा जितेंद्र चौधरी, पोना आनंद कांगरे, पोना  किशोर सुर्यवंशी, पोशि  दिपक थोरात, पोना  सुमित मधाले, पोशि श्रीधर वडगावे यांनी केली आहे. दरम्यान, गुन्हयाचा पुढील तपास पोउपनिरी तानाजी वाघ हे करीत आहेत.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page