मोटार सायकल चोरास कल्याण गुन्हे शाखेने केले जेरबंद…

Published:

डोंबिवली – सराईत मोटार सायकल चोरास कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. रमजान ईब्राहीम शेख असे याचे नाव आहे.

चोरीस गेलेली मोटारसायकल घेऊन एक इसम ९० फिट रोड, पत्री पुल जवळ डोंबिवली पूर्व येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सदर ठिकणी सापळा रचून रमजानला मोटार सायकलसह अटक केली.

रमजानने खडकपाडा, वालीव, कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखी ३ मोटारसायकल चोरी केले असल्याचे सांगितले असून, पोलिसांनी त्याच्याकडून एकूण १,१२,०००/- रू किंमतीच्या एकूण ४ मोटारसायकल जप्त केल्या. त्याच्यावर यापूर्वी मोटार सायकल चोरीचे ८ गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, त्याला पुढील कारवाई करीता डोंबिवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page