डोंबिवली – एका महिलेच्या गळ्याला चाकू लावून जबरी चोरी करण्यात आल्याची घटना डोंबिवली पूर्वेत घडली असून, याप्रकरणी डोंबिवली पोलिसांनी एकास अटक करून ३ विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. अनिल खिल्लारे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, निर्मला लोंगरे या महिला घारडा सर्कल, डोंबिवली पूर्व येथून एका रिक्षात बसल्या असता अनोळखी ४ जणांनी बी.एस.यु. बिल्डींग जवळील मैदान, न्यु गोविंदवाडी, डोंबिवली पुर्व येथे निर्जनस्थळी रिक्षा थांबवून त्यातील रिक्षा चालकाने निर्मला यांच्या गळयाला चाकू लावून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. आणि मागे बसलेल्या दोन मुलांनी त्यांच्या कानास दुखापत करून त्यांच्याकडील २५,०००/- रू. किंमतीचे सोन्याचे कानातले १०,०००/- रू. रोख रक्कम, १,०००/- रू. किंमतीचा मोबाईल आणि १००/- रु. किंमतीची पर्स असा एकूण ३६,१००/- रू. किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेली असल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाण्यात गुरनं। ३६२/२०२४ भादवि क. ३९७, ३९४, ५०६, ३४ सह भारतीय हत्यार कायदा क. ४. २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे अनिल याला अटक करून ३ विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले तसेच चोरीस गेलेला माल आणि गुन्हयात वापरलेली रिक्षा, चाकू असा एकूण १,२०,१००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त गुंजाळ, सपोआ, डोंबीवली विभाग कुराडे, वपोनि सुनिल जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबीवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि बळवंत भराडे, पोहवा सुनिल भणगे, पोहवा विशाल वाघ, पोहवा सचिन भालेराव, पोहवा तुळशीराम लोखंडे, पोना हनुमंत कोळेकर, पोअं शिवाजी राठोड यांनी केली.