साहेब मला माफ करा! वसंत मोरेंचा मनसेला रामराम…

Published:

पुणे – मनसे नेते वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. फेसबूक पोस्ट करत त्यांनी पक्ष सोडल्याची माहिती दिली.

काय म्हणाले वसंत मोरे?

पक्षाच्या स्थापनेपासून किंबहुना त्या आधीपासून मी पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा प्रयत्न माझ्या परिने करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली १८ वर्षे सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात मी कार्यरत राहिलो. मात्र अलिककडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण आणि पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत उपक्रम देतो. त्यांना ताकद देतो, त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचे तंत्र अवलंबले जात आहे. त्यामुळे मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page