डोंबिवली – कल्याण, डोंबिवली परिसरात पायी चालत जाणाऱ्या लोकांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या एकास कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. अफजल बन्ना खान असे याचे नाव असून, सदर प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून ७ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
लोकांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटणारा इसम सदर दागिने विक्री करण्याकरीता सोनार गल्ली, कल्याण पश्चिम परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून अफजल बन्ना खान यास अटक करून त्याच्याकडून २,६३,९३८/- रु.कि.चे ७ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
सदरची यशस्वी कामगिरी पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निलेश सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १) गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोनि राहुल मस्के, सपोनि संदीप चव्हाण, सपोनि संतोष उगलमुगले, पोउपनि संजय माळी, पोहवा विश्वास माने, पोहवा बालाजी शिंदे, पो.हवा दत्ताराम भोसले, पो.ना सचिन वानखेडे, पो.ह किशोर पाटील, पोहवा अनुप कामत, पो.शि विनोद चन्ने, पोशि गुरुनाच जरग, पोशि गोरक्ष शेकडे, पोशि विजेन्द्र नवसारे, पो शि रविन्द्र लांडगे, पो.शि. मिथुन राठोड, पो.हवा रमाकांत पाटील, मपोहवा मिनाक्षी खेडेकर यांनी केली.