मोटार सायकल चोरणारे अटकेत…

Published:

डोंबिवली – दुचाकी चोरणाऱ्या दोघांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. कैलाश सुभाष जोशी उर्फ जे.पी. आणि विक्रम उदय चौहाण अशी या दोघांची नावे आहेत.

याबाबत वृत्त असे आहे कि, सुशांत पालकर यांची पार्किंगमध्ये असलेली मोटारसायकल चोरी झाली असल्याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुषंगाने कल्याण गुन्हे शाखेकडून तपास चालू असताना पोलीस अंमलदार सचिन वानखेडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सागर्ली, डोबिवली (पूर्व) परिसरातून या दोघांना अटक करून त्यांच्याकडून मोटार सायकल हस्तगत केली.

सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पंजाबराव उगले, मा.पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहा.पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली  गुन्हे शाखा, घटक ३,कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पो.नि. राहुल मस्के, सहा.पो.निरी. संतोष उगलमुगले ,सहा.पोनिरी.संदिप चव्हाण, पो.हवा.अनुप कामत, पो.हवा. दत्ताराम भोसले पो.हवा. बालाजी शिंदे, पो.हवा. विलास कडु ,चालक पो.हवा. अमोल बोरकर, पो.ना./ सचिन वानखेडे, पो.शि. विजेद्र नवसारे, पो.शि. विनोद चन्ने यांनी केली.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page