डोंबिवली – चाकूचा धाक दाखवून एका ओला ड्रायव्हरला जबरदस्तीने लुटणाऱ्या तिघांना मानपाडा पोलिसांनी अटक करून २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
शफीक खान, अमन तौकिर अहमद अन्सारी, आमन शैकत जमादार अशी या तिघांची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, डोंबिवली पूर्वेतील पलावा सिटी, गेट नं २, बदलापूर काटई रोड, काटई नाका, डोंबिवली रोडवर ओला ड्रायव्हर जात असताना ३ जणांनी त्याची कार थांबवून वाशी येथे जाण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने कारमध्ये बसून ओला ड्रायव्हरला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्याची कार, मोबाईल, रोख रक्कम १५००/-, एटिएम कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, मतदान ओळखपत्र असा एकूण २,२१,५००/- रू. किंमतीचा माल जबरीने चोरी करून नेले बाबत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे खोणी पलावा फाटा, बदलापूर कटाई रोड या भागात सापळा रचून या तिघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून गुन्हयात जबरी चोरी केलेली कार आणि चाकू असा एकूण २,००,०६०/- रू. किंमतीचा मुददेमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कामगिरी दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण, सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण व सुनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोनि (गुन्हे) राम चोपडे, पोनि (का व सु) दत्तात्रय गुंड, सपोनि. संपत फडोळ, सपोनि प्रशांत आंधळे, सपोनि. महेश राळेभात, सपोउपनिरी. भानुदास काटकर, पोहवा सुनिल पवार, पोहवा. संजु मासाळ, पोहवा.विकास माळी, पोहवा. शिरीष पाटील, पोहवा. सोमनाथ ठिकेकर, पोना. गणेश भोईर, पोना. प्रविण किनरे, पोना. अनिल घुगे, पोशि. विजय आव्हाड, पोशि. अशोक आहेर, पोशि. नाना चव्हाण यांनी केली.