ठाणे – नौपाडा वाहतूक उपविभागातर्फे ३४ वा रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत रिक्षा चालक मालक, टेम्पो चालक मालक, पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्यासाठी तीन हात नाका येथील नौपाडा वाहतूक उपविभागात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात १३५ जणांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. या शिबिरात नेत्र तपासणी देखील करण्यात आली. पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग विनय कुमार राठोड, शिवनेरी हॉस्पिटल ईशा नेत्रालय यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडले. दरम्यान, यावेळी रिक्षा चालक, टेम्पो चालक यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला कवियत्री गावित सहा. पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग, रामचंद्र मोहिते, वपोनिरी नौपाडा वाहतूक विभाग आणि पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.