भिवंडी – दिड करोडच्या मुद्देमालासह घरफोडी चोरी करणाऱ्या दोघांना नारपोली पोलिसांनी अटक केली. रेहान युसुफ अली खान आणि मोहमंद सलीम मोहमंद इद्रीस चौधरी अशी या दोघांची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, राज ट्रेडर्स याचे गाळा नं ३ ओसवाल कंपाऊंड, बाबा वेअर हाऊसच्या बाजूला, पुर्णा गाव भिवंडी येथील बंद गाळयाचे शटर अज्ञात चोरट्याने उचकटून गोडावून मध्ये प्रवेश करुन गोडावून मधील ७५,०६,०००/- रू किंमतीचे टिव्ही चोरी करुन नेले म्हणून नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच श्री माँ बिल्डींग, शॉप नं.२.३ वेहेळे रोड, व्हॉल्हो कंपनी जवळ, मानकोली, ता. भिवंडी, जि.ठाणे येथील गोडावूनचे मुख्य शटर कोणीतरी अज्ञात चोरट्याने उचकटुन गोडावूनमधील १,३८,०५,६२७ /- रूपये किंमतीचे मेडीकल इक्युपमेन्ट साहित्य चोरी करून नेले म्हणून नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोबंडपाडा भिवंडी येथून राज ट्रेडर्स, भिवंडी याठिकाणी चोरी करणारा रेहान युसुफ अली खान यास अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी एकूण २५,६०,०००/- रु. किंमतीचे टीव्ही हस्तगत केले. तसेच श्री. माँ बिल्डिंग, भिवंडी याठिकाणी चोरी प्रकरणी तपास करून मोहमंद सलीम मोहमंद इद्रीस चौधरी यास अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या त्याच्याकडून पोलिसांनी १,२५,६१,९६८ /- रू. किंमतीचे मेडीकल इक्युपमेन्ट साहित्य जप्त केले. अशा प्रकारे वरील दोन्ही गुन्ह्यात पोलिसांनी अटक दोघांकडून एकूण १,५१,२१,९६८/- रू किं चा मुद्देमाल हस्तगत केला.