कल्याण बाजारपेठ पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी…

Published:

ए.पी.एम.सी मार्केट परिसरातून हत्यारांसह चौघांना केली अटक…

कल्याण –  व्यापाराला लुटण्यासाठी आलेल्या चौघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक करून ७१ हजरांचा मुद्देमाल हस्तगत केला. आजीम रोफ गाझी, आरफत युसूफ शेख, अरबाज इस्माईल शेख आणि अन्वर शोकत शहा अशी या चौघांची नावे आहेत.

गुजरात वरून ए.पी.एम.सी मार्केट कल्याण येथे धान्य घेऊन येणाऱ्या वाहनावरील धान्य व्यापाराला लुटण्यासाठी काही इसम हत्यारासहित येणार असल्याची बातमी डिटेक्शन स्टाफ मधील पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळाली होती.

त्याअनुषंगाने डिटेक्शन ब्रांचचे इन्चार्ज Api नवनाथ रुपवते यांनी ताबडतोब व.पो.निरीक्षक अशोक कडलग,यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.एम.सी मार्केट कल्याण परिसरात डी. बी पथकतील पो हवा.सचिन साळवी, पो हवा.तुळशीराम पावशे, पो हवा.परमेश्वर बाविस्कर, पो हवा.संदीप घुगे, पो.हवा. रवी भालेराव, पो हवा. किरन् सोनार, पो.ना रविन्द्र पाटील, पो शि.अरुण आंधळे, व पो शि.रामदास फड यांनी सापळा रचून चौघांना अटक केली. दरम्यान, यांचे अजून ३ साथीदार पळून गेले.

पोलिसांनी या चौघांकडून चॉपर, सुरा, मिरची स्प्रे, दोरी असा एकूण ७१,४००/- रु मुदेमाल हस्तगत केला.

सदरची यशस्वी कामगिरी सचिन गुंजाळ पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण, कल्याणजी घेटे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली  व.पो.निरी.अशोक कडलग, स.पो.निरी.नवनाथ रुपवते आणी D B टीम बाजारपेठ यांनी केली असून, पुढील तपास सपोनिरी नवनाथ रुपवते हे करीत आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page