बदलापूरच्या एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट…

Published:

बदलापूर – शहरातील खरवई एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली असून, या स्फोटामध्ये ४ ते ५ कामगार जखमी झाले आहेत, तर एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर खरवई एमआयडीसीतील व्ही.के केमिकल या कंपनीला पहाटेच्या सुमारास हि आग लागली. कंपनी बाहेर दोन टेम्पो उभे होते. या टेम्पोमधील केमिकल मध्ये आधी आग लागली. त्यानंतर ही आग कंपनीमध्ये पसरली. या आगीमुळे कंपनीत ४ ते ५ स्फोट झाले. आणि या घटनेत ४ ते ५ कामगार गंभीर जखमी झाले, तर एका कामगाराचा मृत्यू झाला. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलं आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page