बांधकाम व्यावसायिकाकडून ५० हजारांची खंडणी घेणारा गजाआड…

Published:

ठाणे – बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी बिल्डरकडून ५० हजारांची खंडणी घेताना भारतीय कामगार कर्मचारी महासंघ प्रणित असंघटीत कामगार महासंघाचा वार्ड अध्यक्ष शांताराम शेळके यांना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने रंगेहात पकडले. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिल्डर संदीप पंडीत गायकवाड उर्फ पप्पु हार्दिक यांचे उल्हासनगर नंबर १ येथे सुरू असलेल्या बांधकामावर तोडक कारवाई करण्यात यावी याबाबत शांताराम शेळके यांनी उल्हासनगर महानगरपालिकेत तक्रार अर्ज केला होता हा अर्ज मागे घेण्यासाठी शांताराम शेळके यांनी बिल्डर संदीप गायकवाड यांच्याकडे ५० हजारांची खंडणी मागितली होती. हि खंडणी रक्कम संदीप गायकवाड यांच्याकडून घेताना शांताराम शेळके यांना खंडणी विरोधी पथकाने रंगेहात पकडले.

सदरची यशस्वी कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे शहरचे वपोनि शेखर बागडे, सपोनि सुनिल तारमळे, सपोनि भुषण कापडणीस, सपोउनि संजय बाबर, पोहवा गणेश गुरसाळी, पोहवा संजय राठोड, मपोहवा शितल पावसकर, मपोशि मयुरी भोसले, चापोना भगवान हिवरे यांनी केली.    

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page