घरफोडी करणारा गजाआड…

Published:

डोंबिवली – घरफोडी करणाऱ्यास डोंबिवली पोलीसांनी अटक करून १ लाखांचा मुददेमाल हस्तगत केला. आकाश केदारे असे याचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेतील आयरेगावातील एका घरातून  सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण १,२०,५००/- रु. चा. मुद्देमाल चोरी झाला असल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ४६१/२०२३ कलम ३८० भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आयरेगावातील ज्योतीनगर परिसरातून आकाशला अटक केली. तसेच त्याच्याकडून एकूण १,१०,५००/- रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page