मुंबई – प्रियसीची हत्या करून परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या प्रियकरास साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. शोहेब शेख असे याचे नाव आहे.
शोहेब शेख याने कोठेतरी गंभीर गुन्हा करुन पळून जात असल्याची माहिती साकीनाका पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून साकीनाका जंक्शन येथून शोहेब शेखला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने नवी मुंबईतील कोपरखैरणेतील हॉटेल फ्लॅग सिफ अश्विन येथे प्रियसी अॅमी उर्फ अमित सिंग उर्फ अमित रविदर कौर हिची हत्या करून परराज्यात पळून जात असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे तुर्भे पोलिसांना याबाबत माहिती दिली असता त्यांना सदर ठिकणी अॅमी उर्फ अमित सिंग हीच मृतदेह मिळून आला.
अशा प्रकारे खुनाचा गुन्हा दाखल करण्यापूर्वीच साकीनाका पोलिसांकडून गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे. तसेच आरोपीस तुर्भे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.