कल्याण – धारदार शस्त्रासह एकास कल्याण क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केली आहे. सागर उर्फ डोळा काशिनाथ दाते असे याचे नाव असून, तो डोंबिवली पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील नामचीन तडीपार केलेला गुंड आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, दिनांक 06/01/2024 रोजी कल्याण क्राईम ब्रँचचे युनिट-3 चे पो.हवा.दत्ताराम भोसले यांना त्यांचे गुप्त बातमीदरा मार्फत बातमी मिळाली की,डोंबिवली पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड वरील नामचीन तडीपार केलेला गुंड सागर उर्फ डोळा काशिनाथ दाते हा दत्तनगर प्रगती कॉलेजच्या समोर गार्डन जवळ डोंबिवली पूर्व हा या परिसरात हातात धारदार भला मोठा कोयता घेऊन फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच कल्याण क्राईम युनिट -3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार साहेब यांना कळविताच त्यांनी तात्काळ त्याचे मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणे जाऊन कारवाई करण्याचे आदेश पथकातील स.पो.निरी.संतोष उगलमूगले,पो.उप.निरी. संजय माळी,पो.हवा.दत्ताराम भोसले,विश्वास माने,बालाजी शिंदे, मिथुन राठोड,गुरुनाथ जरग या पथकास दिले,लागलीच मिळालेल्या बातमीवरून सदर ठिकाणी विलंब न लावता जाऊन डोंबिवली पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील हद्दपार (तडीपार) इसम नामे सागर उर्फ डोळा काशिनाथ दाते वय 28 वर्षे राहणार- दत्तनगर प्रगती कॉलेज जवळ डोंबिवली पूर्व हा पोलिसांना पाहून पळत असताना पाठलाग करून त्यास घातक हत्यार कोयत्यासह पकडले तसेच सदर हद्दपार (तडीपार) गुंड यास कल्याण-डोंबिवली परिमंडल-3,मधून दि. 06/06/2023 रोजी पासून 18 महिन्या करिता हद्दपार (तडीपार) केले असून याचे वर घातक शास्त्राने वार करून दहशत माजवणे असे 3 गुन्हे,तसेच एन.डी.पी.एस.चा 1 गुन्हा असे एकूण 4 गुन्हे डोंबिवली पोलीस स्टेशन च्या रेकॉर्डवर दाखल असून त्याचे विरुद्ध डोंबिवली पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम 4,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे कारवाई करून ताब्यात देण्यात आले आहे.
तसेच वरील तडीपार गुंडास कल्याण क्राईम ब्रांचने युनिट-3 ने त्यास पकडून कारवाई केल्याने सदर भागातील जनतेकडून पोलिसांचे कामगिरीच कौतुक होत आहे.