तंबाखूजन्य पदार्थ जप्त, एकास अटक…

Published:

भिवंडी – तंबाखूजन्य पदार्थ राजनिवास सुंगधीत पानमसाला व जाफरानी जर्दा तंबाखू असा एकूण 13,82,400/- रूपये किंमतीचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून एकास कोनगांव पोलिसांनी अटक केली.

राकेश शर्मा असे याचे नाव असून, कोनगाव पोलीस ठाण्याचे सपोनि कडलग, पोना हाडळ आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरून रांजनोली नाका ब्रिजखाली, फॉरेस्ट चौकी समोर, भिवंडी येथे छापा टाकला असता, त्याठिकाणी राकेश शर्मा हा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखूजन्य पदार्थ राजनिवास सुंगधीत पानमसाला व जाफरानी जर्दा तंबाखू असा एकूण 13,82,400/- रूपये किंमतीचा माल विक्रीकरिता बेकायदेशीररित्या टेम्पोमधून वाहतूक करताना मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page