ठाणे – पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या करून फरार झालेला पती अमित बागडी याला अखेर गुन्हे शाखा घटक ५ वागळे पोलिसांनी अटक केली आहे.
घरगुती कारणावरून अमितने कासारवडवली परिसरात राहणारी आपली पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे हरयाणा येथून अमितला अटक केली.
सदरची यशस्वी कामगिरी सदरची कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त गुन्हे शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) गुन्हे निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे घटक – ५, ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सपोनिरी भुषण शिंदे, सपोनिरी. पल्लवी ढगेपाटील, सपोनिरी, अविनाश महाजन, पोउपनिरी तुषार माने, पोउपनिरी सुनिल अहिरे, पो. हवा रोहीदास रावते, पोहवा सुनिल निकम, पोहवा जगदीश व्हावळदे, पोहवा माधव वाघचौरे, पोहवा सुनिल रावते, पो.ना तेजस ठाणेकर, पोना उत्तम शेळके, पोशि यश यादव या पथकाने तसेच गुन्हे शाखेतील वपोनिरी आनंद रावराणे, वपोनिरी योगेश आव्हाड, सपोनिरी सुनिल तारमळे, सपोनिरी भुषण कापडणीस या पथकाने केली आहे.