संसदेतल्या ७८ खासदारांचे निलंबन…

Published:

नवी दिल्ली – संसदेच्या एकूण ७८ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. बेशिस्त वर्तन आणि सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल राज्यसभा आणि लोकसभेतून आज एकूण ७८ खासदारांना निलंबित करण्यात आले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ३३ खासदारांना निलंबित केले. तर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षांच्या ४५ खासदारांना निलंबित केले आहे.

लोकसभेच्या ३ तर राज्यसभेच्या ११ खासदारांचे निलंबन विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत, तर उर्वरित ३४ खासदारांचे निलंबन सध्या सुरु असलेले अधिवेशन संपेपर्यंत आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात लोकसभेच्या १३ आणि राज्यसभेचा १ अशा १४ खासदारांना बेशिस्त वर्तनाबद्दल सभागृहातून निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या आता ९२ वर पोहोचली आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page