डोंबिवली – मोटार सायकल चोरी करणाऱ्या एकास गुन्हे शाखा घटक – ३ कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. निरज चौरसिया असे याचे नाव असून, त्याच्याकडून चोरीच्या ५ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एक इसम काटई नाका, काटई गाव, डोंबिवली पूर्व या ठिकाणी चोरीची मोटार सायकल घेऊन उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून निरज चौरसिया यास अटक करून त्याच्याकडून एकूण १,२५,०००/- रू. किंमतीच्या ५ मोटार सायकल हस्तगत केल्या.
सदरची यशस्वी कामगिरी पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व निलेश सोनावणे सहा पोलीस आयुक्त (शोध १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सपोनि संदिप चव्हाण, पोउनि संजय माळी, पोहवा विश्वास माने, पोहवा बालाजी शिंदे, पोहवा विलास कडु, पोहवा बापुराव जाधव, पो.कॉ. मिथुन राठोड, पो.कॉ. गुरुनाथ जरग, पो.कॉ. गोरक्ष शेकडे यांनी केली आहे.