अश्लील फोटो, व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्यास अटक…

Published:

ठाणे – अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावरून प्रसारित करण्याची धमकी एका महिलेस देऊन ते प्रसारित न करण्यासाठी वारंवार खंडणी उकळणाऱ्या एकास श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. विशालभाई लक्ष्मणभाई राठोड असे याचे नाव असून, तो सदर महिलेच्या दुकानात लेडीज टेलर म्हणून काम करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार विशालभाईने अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावरून प्रसारित करण्याची धमकी देऊन ते प्रसारित न करण्यासाठी या महिलेकडून आज पर्यंत १ लाख १० हजार रूपये खंडणी घेतली होती. त्यानंतर हे प्रकरण कायमस्वरूपी मिटवून ते अश्लिल व्हिडीओ व फोटो डिलीट करण्यासाठी पुन्हा ५० हजार रूपयाची खंडणीची मागणी केली होती.

त्यानुषंगाने पोलिसांनी त्रिमुर्ती हॉटेल, पाच रस्ता, मुलुंड येथे विशालला खंडणीची रक्कम ३०,०००/- रु. स्विकारल्यानंतर रंगेहात पकडले. आणि त्याच्याकडून मोबाईल, धमकी देण्यासाठी वापरलेली सिमकार्ड, खंडणीची रक्कम हस्तगत केले.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page