नवी मुंबई – दिवसा घरफोडी करणाऱ्या पाच जणांना सीबीडी पोलीसांनी अटक करून ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सददामहुसेन जमालुददीन खान, निलेश राजू लोंढे, संजय रत्नेश कांबळे, गुडडू रामधनी सोनी आणि विक्की राजू लोंढे अशी या पाच जणांची नावे आहेत.
फिर्यादीच्या घरातून २०६ ग्रॅम वजनाचे सोने व १०,०००/- रू रोख रक्कम असा एकूण ८,३२,०००/- रू.चा ऐवज दिवसा घरफोडी करून कोणीतरी अज्ञात इसमांनी चोरून नेला असल्याबाबत सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिक, शिर्डी, सातारा, कोल्हापूर, पुणे व पालघर परिसरात शोध घेऊन आरोपी गुजरात राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना महाराष्ट्र-गुजरात सीमेवर अच्छाड ता. तलासरी, जि. पालघर येथून अटक केली. तसेच त्यांच्याकडून सीबीडी, खारघर, नेरूळ व मालवणी परिसरात त्यांनी केलेले घरफोडी, ऑटोरिक्षा व लॅपटॉप चोरीचे एकूण ४ गुन्हे उघडकीस आणून सोन्याचे दागिने, मोबाईल, रिक्षा आणि लोखंडी कटावणी असा एकूण ९,१२०००/- रु. मुद्देमाल हस्तगत केला.