कल्याण – मुंबई व कल्याण परिसरातून रिक्षा चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास कल्याण गुन्हे शाखा, घटक ३ पोलिसांनी अटक केली आहे. सोहम दिपक इस्वलकर असे याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ७ रिक्षा हस्तगत केल्या आहेत.
कल्याण पूर्व परिसरात एक इसम रिक्ष ठेऊन संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी सापळा रचून सोहमला अटक केली. त्याच्याकडील रिक्षा ही बाजारपेठ पोलीस ठाणे कल्याण पश्चिम येथून चोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याने धारावी, कुर्ला, विकोळी, कांजुरमार्ग, कल्याण परिसरातून रिक्षा चोरी केल्याचे तसेच त्या रिक्षा विक्री करण्याच्या हेतून उल्हासनगर येथील एका मोकळया मैदानात उभ्या करून ठेवल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी एकूण ७ रिक्षा असा एकूण ३,१०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची यशस्वी कामगिरी पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निलेश सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १) गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सपोनि संतोष उगलमुगले, पोउपनि संजय माळी, पोहवा विश्वास माने, पोहवा विलास कडु, पोहवा बालाजी शिंदे, पोहवा अनुप कामत, पोहवा बापु जाधव, मपोहवा जोत्स्ना कुभारे, मपोहवा मेघा जाने, पोना दिपक महाजन, पोशि गुरूनाथ जरग, पोशि गोरक्ष शेकडे पोशि नवसारे, मपोशि मंगल गावीत यांनी केली.