डोंबिवली – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्मचारी विनोद लकेश्री यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चौघांना राम नगर पोलिसांनी अटक केली आहे. कमरूद्दीनन ईस्माईल शेख, अरबाज वहाब सय्यद, मो. इस्त्राईल मोहिद्दीन शहा, शाहरूख शेख मो. फझरूद्दीन शेख अशी या चौघांची नावे आहेत.
काही दिवसांपूर्वी विनोद लकेश्री हे डोंबिवली पूर्वेला काही सहकाऱ्यांसोबत चहा पित असताना त्याठिकाणी एका इसमाने विनोद यांच्यावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. सदरबाबत राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करत मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर चौघांना अटक केली.