डोंबिवली – अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. आर्शद करार खान आणि शादाबुदीन मोईनुद्दीन सय्यद अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ५८ ग्रम वजनाची सफेद रंगाची किस्टल एम.डी. पावडर (अंमली पदार्थ) जप्त केली.
मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील लोढ़ा पलावा, फेज-२, खोणी भागात २ इसम एम.डी. हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आले असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आर्शद करार खान आणि शादाबुदीन मोईनुद्दीन सय्यद या दोघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून एकूण २,३२,०००/- रू किंमतीची ५८ ग्रम वजनाची सफेद रंगाची किस्टल एम.डी. पावडर (Methadone), १ मोटार सायकल, २ मोबाईल, २.२३,४०४/- रू रोख रक्कम असा एकूण ५,३०,४४०/- रू किमंतीचा मुद्देमाल हस्तगत केला.