डोंबिवली – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्मचारी विनोद लकेश्री यांच्यावर एका व्यक्तीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात विनोद जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद लकेश्री हे काही पालिका अधिकाऱ्यांसोबत पालिका कार्यालया बाहेरील एका दुकानात चहा पित असताना अचानक एका इसमाने येऊन विनोद यांच्या हातावर चाकूने वार केले आणि तेथून पळ काढला. दरम्यान, विनोद यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सदर प्रकरणी राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.