ठाणे – मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा, घटक ३ कल्याण पोलिसांनी अटक केली. अक्षय वांडरे असे याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून २ मोबाईल हस्तगत केले आहेत.
रेल्वे प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांच्या जवळील मोबाईल चोरी करणारा व्यक्ती मुंब्रादेवी कॉलनी, दिवा पूर्व येथे मोबाईल विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा, घटक ३, कल्याणचे पोलीस नाईक सचिन वानखेडे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून अक्षय वांडरे यास अटक करून त्याच्याकडून ३६,९९०/- रूपये किंमतीचे २ मोबाईल फोन हस्तगत केले.
सदरची यशस्वी कामगिरी शिवराज पाटील, सहा. पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक ३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोलीस उप निरीक्षक संजय माळी, पोहवा अनुप कामत, पो.हवा. बालाजी शिंदे, पो.हवा. बापूराव जाधव, पो.ना. सचिन वानखेडे यांनी केली आहे.