ठाणे – कोटक महिंद्रा बँकेच्या ऑफीसमधून चोरटयांनी ६ लॅपटॉप लंपास केले असल्याची घटना घडली असून, याप्रकरणी चोरी करणा-या दोघांना श्रीनगर पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. सुधीर बेडंल आणि दिपक सोनावणे अशी या दोघांची नावे आहेत.
कोटक महिंद्रा बँकेचे कॉर्पोरेट ऑफीस नेप्चुन इलिमेंट, वाई या ऑफिस मधून सुमारे ४,५६,०८२/- रूपये किंमतीचे ६ लॅपटॉप चोरी झाले असल्याबाबत श्रीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं २३५ / २०२३ भा.दं.वि कलम ४५४ ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुधीर बेडंल आणि दिपक सोनावणे या दोघांना अटक केली. आणि चोरीस गेलेल्या ६ लॅपटॉप पैकी २ लॅपटॉप सुधीर बेडंल याच्या घरातून आणि ४ लॅपटॉप विक्री केलेल्या इसमांकडून जप्त केले.
दरम्यान, त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी हा गुन्हा त्यांचा साथीदार कृष्णा कदम याच्यासोबत मिळून केला असल्याचे सांगितले. तसेच हाये तिघेही कोटक महिंद्रा बँकेच्या ऑफीसमध्ये हाऊस किपींगचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.