फेरीवाल्यांना मारहाण!…

Published:

कल्याण – परप्रांतीय फेरीवाल्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तुम्ही मराठी लोक अशीच असता, असे अपमानाच्या हेतूने बोलणाऱ्या २ परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांनी मारहाण केली.

मिळालेल्या माहितीनुसार एक तरुण काही कामानिमित्त कल्याणमध्ये आला होता. त्यावेळी त्याने फुटपाथवरील फेरीवाल्याकडून वस्तू विकत घेतली होती, परंतु ती वस्तू खराब असल्याने त्याने त्या फेरीवाल्याला ती वस्तू बदलून देण्यास सांगितले. पण फेरीवाल्यानी ती वस्तू बदलून देण्यास नकार दिला. आणि तुम मराठी लोक ऐसे ही होते हो असे बोलून मराठी माणसाचा अपमान करण्याच्या हेतूने वक्तव्य केले. यावरून तरुण आणि फेरीवाल्यामध्ये वाद झाला. त्यावेळी तेथील इतर फेरीवाल्यांनी देखील या तरुणाशी वाद घालण्यास सुरुवात केली.

दरम्यान, या तरुणाने घडलेला प्रकार मनसैनिकांना सांगितला आणि मनसैनिकांनी या फेरीवाल्यांना बेदम मारहाण केली.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page