कल्याण – दुर्गाडी पुलावर एका ट्रक चालकाची हत्या करणाऱ्या दोघांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अंजला खान, मोहम्मद शेख अशी या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गाडीचा बोल्ट खाली पडल्याने ट्रक चालक भोला कुमारने दुर्गाडी पुलावर गाडी उभी केली होती. त्यावेळी दोघेजण एका दुचाकीवरुन त्याच्याकडे आले, आणि ट्रक थांबविल्याने आमच्या गाडीचे नुकसान झाले आहे, आमच्या गाडीची नुकसान भरपाई दे असे म्हणत या दोघांनी भोला कुमारशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. मात्र भोला कुमारने पैसे देण्यास नकार दिल्याने या दोघांनी धारदार शस्त्राने भोलावर वार करत त्याला जागीच ठार करून तेथून पळ काढला होता.
दरम्यान, सदर घटनेचा तपास करून पोलिसांनी या दोघांना वांद्रे येथून अटक केली.